Blue Storm
शिक्षिका आणि विद्यार्थी म्हणून घट्ट नाते असलेले विद्या आणि कैवल्य 2003 च्या वसंतानंतर एकमेकांना भेटलेच नाहीत. विद्या आणि कैवल्य शिक्षिका आणि विद्यार्थी होते. पण ह्या नात्याच्या पलीकडे, त्यांच्यात मनात खोलवर रुजलेलं एक मैत्रीचं नातं होतं. 2003 चे शैक्षणिक वर्ष संपले तेव्हा ते दोघे भेटले होते... मग 12 वर्षे सरली आणि अचानक वादळी पावसात, एका पुस्तकाच्या दुकानात त्या दोघांची भेट झाली. 12 वर्षांच्या कालावधीत त्यांच्यात साधे बोलणेही झाले नव्हते, पण ते भेटले तेही पुस्तकांच्या दुकानात ! पण त्यानंतर काय घडलं ?.... पुस्तकाच्या पानापासून सुरू झालेला त्या दोघांचा प्रवास जीवनात कुठपर्यंत आला? शालेय जीवनात असताना त्यांनी आपआपल्या जीवनात जी स्वप्ने रंगवली होती, ती पूर्ण झाली का?..... गेल्या 12 वर्षात दोघांच्या जीवनात काय उलथापालथ झाली, त्याचा त्यांच्या जगण्यावर काय परिणाम झाला, ह्याचा संपूर्ण आलेख म्हणजे 'नोव्हेंबरचा पाऊस'. हा प्रवास म्हणजे चक्रव्यूहातून बाहेर पडणाऱ्या जीवनाचे दृश्यस्वरुप आहे. हा प्ले (Blue Storm) इंग्लिश मध्ये ' Asia Playwrights Festival 2021' Incheon, South Korea, मध्ये निवडला होता.
Author Name
Omkar BhatkarTerms and Conditions
All items are non returnable and non refundable